कुणाच्या मागे कोण? जरांगे पाटील मविआ पुरस्कृत? भुजबळांचा पुन्हा दंगलीचा डाव? आरोपांवरून घमासान

| Updated on: Jul 17, 2024 | 11:42 AM

स्वतः तलवारीची भाषा खरणारे आता शांततेचे आवाहन करून नवा कट रचताय का? असा सवाल करत जरांगेनी भुजबळांवर आरोप केलाय. मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेऊन राज्यात शांततेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. मात्र जरांगेंनी भुजबळांच्याच हेतूवर शंका उपस्थित करून त्यांनाच लक्ष्य केलं

मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडी पुरस्कृत आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनामागे पुन्हा दंगली घडवण्याचा डाव आहे का? अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी वर्तविली आहे. स्वतः तलवारीची भाषा खरणारे आता शांततेचे आवाहन करून नवा कट रचताय का? असा सवाल करत जरांगेनी भुजबळांवर आरोप केलाय. मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेऊन राज्यात शांततेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. मात्र जरांगेंनी भुजबळांच्याच हेतूवर शंका उपस्थित करून त्यांनाच लक्ष्य केलं. दुसरीकडे मनोज जरांगेंना महाविकास आघाडीचंच पाठबळ असल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. विशेष म्हणजे ओबीसी एल्गार सभेतून ते त्यांच्याच सरकारला लक्ष्य करत होते. नंतर नवनाथ वाघमारेंनी जरांगेंना मुख्यमंत्र्यांची रसद असल्याचा आरोप केला होता तर काल जरांगेंमागे मविआ असल्याचा दावा हाकेंनी केलाय.

Published on: Jul 17, 2024 11:41 AM
विशाळगडाच्या अतिक्रमणावरून रंगतोय राजकीय वाद, नेमका कुणाचा हात?
Ashadhi Ekadashi 2024 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला… बघा आषाढी एकादशीच्या महापूजेनंतरचं विठुरायाचं गोजिरं रुप