मराठ्यांचं भगवं वादळ, जरांगे पाटलांच्या बीडमधील रॅलीत मराठ्यांची तुफान गर्दी, बघा खास दृश्य

| Updated on: Jul 11, 2024 | 3:42 PM

लाखोंच्या संख्येने मराठे या बीडमधील शांतंता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठ्याचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने या शांतता रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्यामुळे बीडमधील सर्वच रस्ते जाम झाले आहेत. बघा खास दृश्य

मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये शांतता रॅली आहे. लातूर, धाराशिवनंतर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली बीडमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मराठ्यांनी जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने मराठे या बीडमधील शांतंता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठ्याचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने या शांतता रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्यामुळे बीडमधील सर्वच रस्ते जाम झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे बीड शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर तब्बल पाच हजार स्वयंसोवर देखील मदतीला असणार आहेत सगे सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे 13 तारखेला नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published on: Jul 11, 2024 03:42 PM
जयंत पाटलांना बळीचा बकरा केलं…भाजपच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल
Malshej Ghat Drone view : हिरवळ, दाट धुके अन् बेफाम कोसळणारा धबधबा… माळशेज घाटातील हे सौंदर्य तुम्हाला नक्कीच खुणावेल