सगेसोयऱ्यांचा कायदा टिकणारच नाही, मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी ते पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टाईमुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडत त्यांनी सरकारला महिन्याभराचा वेळ दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी सरकारला पुन्हा एक महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. मात्र या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करावं? असा सवाल करत सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी ते पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टाईमुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडत त्यांनी सरकारला महिन्याभराचा वेळ दिला. पण आता सगेसोऱ्याचा कायदा कोर्टात टिकणार नाही, ते शक्यच नसल्याचे मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. बघा नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
Published on: Jun 20, 2024 10:36 AM