Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा चार दिवसीय संवाद दौरा, कुठं दिसणार मराठ्यांचा एल्गार?
मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून पुन्हा एकदा मराठा संवाद दौरा सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील बीड, परभणी आणि जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचा हा संवाद दौरा असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा चार दिवसीय संवाद दौरा हा २० डिसेंबर ते २३ डिसेंबर असा असणार
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभरात चार टप्प्यात आंदोलन झाले. तर आता पाचवा संवाद दौरा मनोज जरांगे पाटील करत आहेत. काल अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असून नवा कायदा करणार असलयाची घोषणा त्यांनी केली. मात्र जरांगे पाटील यांनी त्यास नकार दिला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून पुन्हा एकदा मराठा संवाद दौरा सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील बीड, परभणी आणि जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचा हा संवाद दौरा असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा चार दिवसीय संवाद दौरा हा २० डिसेंबर ते २३ डिसेंबर असा असणार आहे. तर शिंदे सरकारला दिलेली डेडलाईन संपण्यापूर्वी २३ डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा असणार आहे. याच चार दिवसीय संवाद दौऱ्यात मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे.