Manoj Jarange Patil UNCUT : ‘… त्या आधारावर मराठ्याला आरक्षण द्या, ते शब्द तुमचेत’, जरांगेंच्या मागणीपुढे सरकार झुकणार?

| Updated on: Dec 17, 2023 | 6:04 PM

मनोज जरांगे पाटील म्हणाले, २४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही, आता माघार नाही. सरकारने कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागून घेतली आहे. त्यामुळे जे ठरलंय त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, असा निर्धार व्यक्त केला

जालना, १७ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरत आपला निर्धार कायम ठेवला आहे. इतकंच नाहीतर जरांगेंनी २४ डिसेंबरचा अल्टिमेंटमच सरकारला दिला आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, २४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही, आता माघार नाही. सरकारने कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागून घेतली आहे. त्यामुळे जे ठरलंय त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. तर मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसकट ओबीसींमधून आरक्षण द्या. राज्यात आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता आरक्षण देण्यास कोणती अडचण आहे. आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Dec 17, 2023 06:04 PM
जुन्या पेन्शनबाबत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं भाष्य; म्हणाले, पेन्शनची मागणी लावून धरा…
सुषमा अंधारेंच्या आरोपावर गिरीश महाजन थेट म्हणाले, ‘कोण सलीम कुत्ता-गित्ता? मी ओळखत नाही’