जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट; म्हणाले, ‘विचारवंतांशी चर्चा अन् प्रचंड मार्गदर्शन…’
मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांनी मौलाना सज्जाद नौमानी यांची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण काय?
मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र व्हावं लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले तर विचारवंतांशी चर्चा झाली, प्रचंड मार्गदर्शन मिळालं असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे ते असेही म्हणाले, ‘आता संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत. गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावंच लागणार आहे. कारण अडचणीमध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस सापडला आहे. त्यामुळे आपण चर्चा केली पाहिजे. ज्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे, अशा वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे. त्यामुळे आम्ही मौलाना सज्जाद नौमानी यांच्याशी चर्चा केली आहे. ते मोठे व्यक्ती आहे. आदरस्थानी आहे. त्यांचा मानसन्मान आहे त्यांची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेतलं.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. बघा व्हिडीओ काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?