मराठ्यांना सरसकट कुणबीचे दाखले द्या, मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीनंतर आता नवी मागणी काय?
tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सरकारने मराठा आरक्षण द्यावं म्हणून जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जरांगे यांनी दिलेली ही मुदत कालच संपली आहे. मात्र पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. अशातच जरांगेंनी नवी मागणी केलीय.
मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले द्या, अशी जरांगेंची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी विदर्भातला दाखला दिला आहे. ज्या प्रमाणं विदर्भातल्या मराठ्यांनी कुणबी नोंदी केल्यात तशीच संधी आम्हालाही द्या असं जरांगेंनी म्हटलं आहे. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केलं आणि तात्काळ त्यांच्या भेटीला छत्रपती संभाजीराजे पोहोचले. यावेळी जरांगे पाटलांनी, त्यांच्याशी बोलताना नवी मागणी केली आहे. ज्या प्रमाणे विदर्भातल्या मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांच्या आवाहनावरुन आपली नोंद कुणबी अशी केली. त्याप्रमाणंच आम्हालाही प्रतिज्ञापत्र देऊन कुणबी अशी नोंद करण्याची संधी द्या. म्हणजे कुणबीचे दाखले मिळतील असं जरांगे पाटील म्हणालेत. मात्र या मागणीला ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी विरोध केलाय. बघा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?