Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात, महाराष्ट्रात कधी अन् कुठं असणार दौरा?

| Updated on: Nov 15, 2023 | 12:57 PM

जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा आज धाराशिवच्या वाशी परंडा येथे होणार. राज्यभरातील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी पूर्ण. या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेणार, आजपासून ते २३ नोव्हेंबर पर्यंत राज्यात कुठं असणार सभा?

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आजपासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेणार आहेत. जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा आज धाराशिवच्या वाशी परंडा येथे होणार आहे. राज्यभरातील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही मिळतेय. आज मनोज जरांगे पाटील हे वाशी, परांडा, करमाळ याठिकाणी असणार आहेत. १६ नोव्हेंबर करमाळा, दौंड येथे सभा होणार, १७ नोव्हेंबरला मायणी, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर येथे जरांगेंचा दौरा असेल, १८ नोव्हेंबर रोजी कराड, सातारा, मेढा, वाई या ठिकाणी जरांगेंचा राज्यव्यापी दौरा असणार आहे. १९ नोव्हेंबर पाचाड, रायगड, मुळशी, आळंदी, २० नोव्हेंबर आळंदी, तुळापूर, पुणे, खालापूरात असतील. २१ नोव्हेंबर कल्याण, ठाणे, पालघरला सभा घेणार तर २२ नोव्हेंबर त्र्यंबकेश्वर विश्रांतगड, संगमनेर आणि २३ नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर, नेवसा, शेवगाव, धोंडराई येथे जरांगे सभा घेणार आहे.

Published on: Nov 15, 2023 12:09 PM
नुसतं नावातच ‘राम’ नाही तर तो हृदयातही हवा, रामदास कदम यांच्यावर महिला नेत्याची सडकून टीका
ठाकरे गटात सर्वच सोंगाडे अन् 420, भास्कर जाधव सोंगाडे तर संजय राऊत भांडूपचे…, भाजप नेत्यांचा हल्लाबोल