छगन भुजबळ यांचं अडनाव वाटोळं करणारा असं हवं होतं, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं

| Updated on: Feb 09, 2024 | 11:30 PM

'...तर आम्हाला चॅलेंज करावंच लागेल', असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर ओबीसी समाजानं मंत्री छगन भुजबळ यांना फोन करावा आणि सांगावं की त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नये'

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : ‘तुम्ही तीन वेळा आमचं आरक्षण घालवलंय. आता परत तुम्ही त्या वाटेवर येऊ नका, आम्हाला ओबीसी समाजाचं वाटोळ करायचं नाही. पण आता त्यांनी कुठं तरी मराठा सामाजासाठी थांबायला पाहिजे. एवढे विषारी विचार आणि एवढा आकस एखाद्या जाती आणि समाजाविषयी नसला पाहिजे. तुम्ही मंत्री आहात आणि घटनात्मक पदावर आहात. वारंवार ते तसंच करत राहिले तर आमचा नाईलाज आहे. तर आम्हाला चॅलेंज करावंच लागेल’, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर ओबीसी समाजानं मंत्री छगन भुजबळ यांना फोन करावा आणि सांगावं की त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नये. कारण तुमच्यामुळे आमचं वाटोळं होऊ शकतं, असे म्हणत भुजबळ यांचं नाव वाटोळं करणारा असंच हवं होतं, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 09, 2024 11:30 PM
तर तुम्ही दोन दिवस जेवू नका, आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला
5 नेत्यांना भारतरत्न, पण त्यात बाळासाहेब अन् सावरकर नाहीत, निवडणुकांची धामधूम दुसरे काय? सरकारवर टीकास्त्र