क्रिकेटच्या मैदानावर मनोज जरांगे पाटीलांची दमदार बॅटिंग, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange Patil Playing Cricket : मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आवरला नाही क्रिकेट खेळण्याचा मोह... व्हिडीओ एकदा पाहाच, सध्या सर्वत्र जरांगे पाटलांच्या व्हिडीओची चर्चा...
जालना | 24 डिसेंबर 2023 : मराठा अंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. अनेक ठिकाणी सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. कायम मराठा आरक्षणामुळे आक्रमक असलेले जरांगे पाटील आता एका वेगळ्या भूमिकेत दिसले. ज्यामुळे पुन्हा जरांगे पाटील यांची चर्चा रंगू लागली आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनोज जरांगे पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही… हे व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत आहे.
व्हिडीओमध्ये जरांगे पाटील बॉलिंग आणि बॅटिंग करताना पाहात आहेत. एवढंच नाही तर, एका वेगळ्या लूकमध्ये देखील जरांगे पाटील दिसले. कायम पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्ये दिसणाऱ्या जरांगे पाटलांचा नवा लूक यावेळी दिसला… त्यांनी स्पोर्टचं जॅकेट घातलेलं दिसलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या क्रिकेट व्हिडीओची चर्चा रंगली आहे…