मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला ‘तो’ सल्ला १०० टक्के मान्य, म्हणाले…

| Updated on: Nov 26, 2023 | 3:37 PM

प्रकाश आंबेडकर यांचं बरोबर आहे. त्यांना घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास आहे. ते उगाच काही बोलत नाही. त्यांच्याबद्दल मनात चांगल्या भावना आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला हा सल्ला मला मान्य आहे. पण..., मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

संभाजीनगर, १६ नोव्हेंबर २०२३ : जे सोनिया गांधी यांनी केलं ते तुम्ही करू नये, सल्लागारांचं मनोज जरांगे पाटील यांनी ऐकू नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना दिला होता. या सल्ल्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचं बरोबर आहे. त्यांना घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास आहे. ते उगाच काही बोलत नाही. त्यांच्याबद्दल मनात चांगल्या भावना आहेत. त्यांचा हा सल्ला मला मान्य आहे. पण माझा कोणताही सल्लागार नाही, असे जरांगेंनी स्पष्टपणे सांगितले. पुढे जरांगे असेही म्हणाले, मी कोणताही जातीयवाद करत नाही, माझ्यासोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहे. मागे काहीतरी गैरसमज झाला असावा. पण आजपासून त्यांचा सल्ला १०० टक्के मान्य… ते चांगला सल्ला देतात. एकदा पाठबळ दिलं की ते मागे सरकरत नाही. त्यांनी एकदा शब्द दिला की तो ते पाळतात असेही त्यांनी म्हटले.

Published on: Nov 26, 2023 03:37 PM
ध्यानसे देखो और समझो… संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, काय केलं नवं ट्वीट?
हायच ना यार म्हातारा… खोचक टोला लगावत छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल