हिमालयात जाईन, पण राजकारणात जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची भीष्म प्रतिज्ञा
मी राजकारणात जाणार नाही...मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयातच जाईल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत होते.
संभाजीनगर, २६ डिसेंबर २०२३ : मी राजकारणात जाणार नाही…मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयातच जाईल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत होते. मात्र या चर्चांना मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. मी प्रामाणिक आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं स्वप्न काय आहे ते सांगितलं. जरांगे म्हणाले, ‘काहीही होऊ दे, समाजाच्या हितासाठी थेट आंदोलन करायचं. गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पदरात आरक्षण टाकायचं आहे. २० तारखेपासून जीवाची पर्वा न करता रातपाठ एक करायची’,तर मी गोरगरीब मराठा समाजासाठी लढलो माझा समाज माझ्यावर कसलाच अविश्वास करीत नाही. मी 20 जानेवारी तारीख सांगितली समाजाने लगेच मान्य केलं, समाज आता तयारीला लागला आहे. समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही पण राजकारण नकोच, जण आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो, सत्तेत नसताना मी 54 लाख लोकांना न्याय देऊस शकलो, मग सत्तेत जाण्याची गरज नाही, असं स्पष्ट जरांगे म्हणाले.