मराठा आणि कुणबी हे एकच की वेगवेगळे? नारायण राणे यानंतर रामदास कदम यांची उडी
tv9 marathi Special report | नारायण राणेंनंतर आता रामदास कदमांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केलाय. मात्र ज्यांना हवं त्यांनी घ्यावं, असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय. सोशल मीडियात टीका सुरु झाल्यानंतर नितेश राणेंनी काय केली सारवासारव?
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठा आणि कुणबी मराठा हे एकच आहेत की वेगवेगळे, या वादात आता नारायण राणेंनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी उडी घेतली आहे. तर दुसरीकडे राणेंच्या विधानानंतर सोशल मीडियात अनेक ऐतिहासिक दाखल्यांचे पोस्टही व्हायरल होत आहेत. एकीकडे सरकारनं जरांगे पाटलांना आश्वासन दिलंय आणि दुसरीकडे सत्ताधारी नेते जरांगे पाटलांच्या मागण्यांना चूक ठऱवतायत. नारायण राणेंनंतर आता रामदास कदमांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केलाय. मात्र ज्यांना हवं त्यांनी घ्यावं, ज्यांना नको त्यांनी घेऊ नये, असं उत्तर जरांगे पाटलांनी दिलंय. तर दुसरीकडे 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे असून एकही ९६ कुळी मराठा कुणबी सर्फिफिटेक घेणार नसल्याचा दावा राणेंनी केला. त्यावरुन सोशल मीडियात टीका सुरु झाल्यानंतर राणे असं म्हणालेच नसल्याची सारवासारव नितेश राणेंनी केलीय.