मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका… जरांगे पाटलाचं बारसकरांच्या ‘त्या’ आरोपांना उत्तर
जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मुंबईत पत्रकार परिषद घेत अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील मोठे खुलासे करत त्यांनी जरांगेंची पोलखोलच केली
जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मुंबईत पत्रकार परिषद घेत अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील मोठे खुलासे करत त्यांनी जरांगेंची पोलखोलच केल्याचे पाहायला मिळाले. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारसकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळत त्यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा आंदोलनाच्या सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाल्याच्या आरोपावर जरांगे पाटील म्हणाले, समाजाने ठरवायला पाहिजे. समाज मला उद्या बोलला की बाजूला हो..मी एका मिनिटात बाजूला होईल. मला कसलाच मोह नाही. मात्र संत तुकाराम महाराजांच्या मागे लपून मराठ्यांचं वाटोळं करायच्या नादात पडू नका, असे म्हणत जरांगे पाटलांनी त्यांना इशाराच दिला आहे.