“…अन्यथा मी पाणउतारा करेन”, नारायण राणे यांना जरांगे पाटलांची शेवटची विनंती

| Updated on: Feb 16, 2024 | 3:05 PM

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. जरांगेंनी बेताल बडबड करू नये आता त्‍याने मर्यादा ओलांडली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावर जरांगे पाटलांनी पलटवार केलाय.

जालना, १६ फेब्रुवारी २०२४ : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ‘ मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. जरांगेंनी बेताल बडबड करू नये आता त्‍याने मर्यादा ओलांडली आहे.’, असे राणे म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय. ‘मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. मी माझ्या मर्यादा पळतोय म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन’, असे मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना उद्देशून म्हटले.

Published on: Feb 16, 2024 03:05 PM
किशोरी पेडणेकर यांना दिलासा, २२ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई नाही; काय आहे प्रकरण?
मराठ्यांना फसवलं तर पुन्हा.. मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा