तूच नादाला लागू नको, बाद होशील… प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगे पाटलांचा कोणाला इशारा?
''मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागल्याने ते भरकटले आहेत', असं वक्तव्य अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना केलं. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्या, वागण्यामुळे इतर समाजाकडून जे समर्थन मिळत होते त्यापासून ते आता दुरावत चालले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही…'
देवेंद्र फडणवीसांवरून मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या टीकेच्या जोरदार भडका उडाला. यानंतर आता भाजप नेते आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागल्याने ते भरकटले आहेत’, असं वक्तव्य अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना केलं. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्या, वागण्यामुळे इतर समाजाकडून जे समर्थन मिळत होते त्यापासून ते आता दुरावत चालले आहे, अजूनही वेळ गेलेली नाही… कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडावं, असा सल्लादेखील अमित साटम यांनी जरांगे पाटलांना दिलाय. अमित साटम यांनी केलेल्या हल्लाबोल नंतर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय. इतकंच नाहीतर तू नादाला लागू नको नाहीतर बाद होशील, असा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Published on: Jul 19, 2024 06:03 PM