फडणवीसांवरून जरांगेंचा टीकेचा भडका, जीभ घसरली; लाड-दरेकर 20 तारखेचं चॅलेंज स्वीकारणार?
देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटील वारंवार टीका का करतात, यावरून त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा रोग झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती. त्यावरूनच मोठा वाद-विवाद सुरू झाला आहे. फडणवीस फडणवीस करणाऱ्यांनी आधी समाजाचं काय नुकसान होतंय ते पाहावं... जरांगे पाटलांचा पलटवार
देवेंद्र फडणवीसांवरून मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या टीकेच्या जोरदार भडका उडाला. देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटील वारंवार टीका का करतात, यावरून त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा रोग झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती. त्यावरूनच मोठा वाद-विवाद सुरू झाला आहे. फडणवीस फडणवीस करणाऱ्यांनी आधी समाजाचं काय नुकसान होतंय ते पाहावं…असं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, मराठवाड्यानंतर मनोज जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्रात शातंता रॅलीचा दुसरा टप्पा काढणार आहे. या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यात ७ ते १३ ऑगस्टदरम्यान, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक या ठिकाणी मराठ्यांचं वादळ पाहायला मिळणार आहे.
Published on: Jul 19, 2024 12:14 PM