बाकीची वळवळ करू नका… देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ आवाहनानंतर जरांगे पाटील यांचा पलटवार

| Updated on: Oct 29, 2023 | 2:17 PM

VIDEO | जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यानंतरही कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखतीत सरकार जरांगे यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलं. यावरूनच जरांगेंनी केला पलटवार

जालना, २९ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ही ९ मराठीला नुकतीच स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचं आवाहन केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जरांगे यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल करत पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कानात बोळे घातले आहेत काय? या म्हटलं ना, चर्चेला… फक्त एकदाच चर्चेला या. मला बोलता येते का बघा. आजच्या आज या. त्यानंतर मला मला बोलता येणार नाही. माझी परिस्थिती आहे. फक्त एकदाच या. आरक्षण द्यायचं की नाही सांगा. बाकीची वळवळ करू नका, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे.

Published on: Oct 29, 2023 02:17 PM
बळीराजा सुखावला, राज्य सरकारनं घेतला कांदा निर्यात शुल्काबाबतचा मोठा निर्णय
Shambhuraj Desai : शिंदे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला जाणार? मंत्री शंभूराज देसाई स्पष्टच म्हणाले…