छगन भुजबळांनी दिलेल्या ओपन चॅलेंजवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय…

| Updated on: Sep 10, 2024 | 3:24 PM

‘टीव्ही 9 मराठी’चा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी खुलं आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले होतं. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा, असे म्हणत भुजबळांनी खुलं आव्हान दिलं होतं. यावर आता जरांगेंनी पलटवार केलाय

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोज जरांगे पाटील यांनी रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा, असे म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना खुलं आव्हान दिलं होतं. यावरच मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांना काहीच काम नाही. खिल्ली उडवण्याशिवाय काम नाही. येणाऱ्या निवडणुकीत १ लाख मतांनी काय ५० लाख मतांनी निवडून येऊदे… ते वेळेवर बघू, असे म्हणत छगन भुजबळ यांनी दिलेल्या आव्हानावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकून, त्यांच्या सांगण्यावरून माझ्याविरोधात बोलत आहे. सगळ्या नेत्यांचा मोठा मुकादम देवेंद्र फडणवीस आहे. त्याला आता काय काम राहील आहे. मी तज्ञ नाही, लहान मोठे खूप मुकादम आहेत. मी येडा आहे, पण गरिबांसाठी काही न काही करतो ना…, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला तर भुजबळ त्याला आता काही काम नाही, काम तर पाहिजे नाही काही, असा खोचक टोला त्यांनी भुजबळ यांना लगावला.

Published on: Sep 10, 2024 03:24 PM