मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना केली विनंती; म्हणाले, आताही आमच्या गोर गरिबांचं…

| Updated on: Nov 17, 2023 | 10:33 AM

मराठ्यांना अशाप्रकारचं आरक्षण कधीच मिळणार नाही. हे मी जरांगेंच्या तोंडावर सांगून आलो होतो. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पाहवं लागेल. त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून राज्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

पुणे जेजूरी, १७ नोव्हेंबर २०२३ : मराठ्यांना अशाप्रकारचं आरक्षण कधीच मिळणार नाही. हे मी जरांगेंच्या तोंडावर सांगून आलो होतो. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पाहवं लागेल. त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून राज्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आमच्या मागे फक्त आमचा समाज आहे. दुसरं कोणी नाही. जर आमच्या मागे कोणी असेल तर त्यांनी ते शोधून द्यावं. त्यांचा सल्ला आधी योग्य होता. मात्र आता आम्हाला आमचे पुरावे सापडले आहेत. कुणबीचे पुरावे मिळाल्याने आता माराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला तर यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली. जरांगे पाटील म्हणाले, पहिले ते आमच्या पाठिशी ठाम होते. आताही आमच्या गोर गरिबांचं कल्याण होणार आहे. त्यांनी मराठा लेकरांच्या पाठिशी पाठिंबा म्हणून ठाम राहावं, अशी विनंती केली.

Published on: Nov 17, 2023 10:33 AM
गावबंदी, जाळपोळ असेच होत राहील तर मणिपूरची पुनरावृत्ती, प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिंदे गट अन् ठाकरे गटात राडा, मुख्यमंत्री म्हणाले, बाटग्यांना ‘तो’ अधिकारच नाही