मनोज जरांगे पाटलांचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार; म्हणाले, ‘आता गनिमी काव्याने डाव…’

| Updated on: Oct 23, 2024 | 5:06 PM

जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जो आपल्याला ५०० रुपयांच्या बॉन्डवर लिहून देईल की, मी तुमच्या सर्व मागण्यांशी सहमत आहे त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी मांडली होती. आता उद्या जरांगे पाटील आपला पहिला उमेदवार जाहीर करणार आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे आपले उमेदवार उतरवणार असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली होती. जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे जो आपल्या विचाराचा आहे तिथे लाखभर मतदान देवून त्या उमेदवाराला निवडून द्यायचं, असं जरांगे यांनी स्पष्ट केले असताना आता मनोज जरांगे पाटील हे २३ जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. उद्या एक उमेदवार जाहीर करण्याची प्रकिया पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार कळल्याशिवाय उमेदवार जाहीर करणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी गनिमी काव्याने डाव टाकणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले की विरोधकांनी आमच्यावर डाव टाकला आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर गनिमी काव्याने डाव टाकणार आहोत. त्यांचे उमेदवार कोण आहे हे पाहणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आमचे उमेदवार आणि मतदारसंघ कोणते आहेत ते आताच आम्ही कळू देणार नाहीत. तर आता आमची भूमिका ही सावधगिरीने असणार आहे.

Published on: Oct 23, 2024 05:06 PM
नवाब मलिक वेटिंगवर…राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नावच नाही, अजितदादा तिकीट देणार की नाही?
शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री…