पुन्हा वातावरण तापलं, जरांगे पाटलांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप; आक्रमक आंदोलनामागे कुणाचा हात?

| Updated on: Feb 27, 2024 | 10:49 AM

बारसकरांसह जे जे आंदोलन बदनाम करत आहेत, त्या सर्वांमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर सगेसोय़ऱ्यांची अट लगेच मान्य होईल, मात्र मराठा असो किंवा धनगर साऱ्या जातीचा वापर देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी करत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला.

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ : अजय बारसकरांसह जे जे आंदोलन बदनाम करत आहेत, त्या सर्वांमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी आता राजकीय वास येत असल्याचा आरोप केलाय. अजय बारसकर यांनी जरांगेंच्या केलेल्या आरोपांनंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, यावेळी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मोठा ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर सगेसोय़ऱ्यांची अट लगेच मान्य होईल, मात्र मराठा असो किंवा धनगर साऱ्या जातीचा वापर देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी करत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशपातळीवरील भाजप अनेक नेते आणि मोठ्या जातींना संपवण्याचा डाव असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. बघा काय केला देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Published on: Feb 27, 2024 10:49 AM
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? सुरेश वाडकर नेमकं काय म्हणाले, पाहा व्हिडीओ
नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पोलिसांच्या पत्नी आक्रमक; म्हणाल्या.. दिडफुट्या, तू हिरो आहेस का?