मराठ्यांविरोधात डाव… जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप, बघा काय केली घणाघाती टीका
सरकारमधील काही मंत्र्यांनी मराठ्यांविरोधात डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर माझ्यावर ट्रॅप टाकणार तसेच रॅलीत कुणाला तरी घुसवणार असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : येत्या २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहे. या आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा रोडमॅप तयार झाला असून २० जानेवारी रोजी मराठ्यांसह जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होण्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान, सरकारमधील काही मंत्र्यांनी मराठ्यांविरोधात डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर माझ्यावर ट्रॅप टाकणार तसेच रॅलीत कुणाला तरी घुसवणार असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले की, मराठा समाजाच्या जीवावर चालणाऱ्या दुकानदाऱ्या बंद पाडल्या, मराठ्यांविरोधात पत्रकार परिषद कार्यक्रम घ्यायला लावले आहेत. रात्री सरकारची मोठी बैठक झाली सरकार २ वाजेपर्यंत बैठका घेत आहेत. तर सरकारमधील मंत्र्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.