जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांनंतर अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर…

| Updated on: Sep 29, 2024 | 12:34 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली.

अमित शाह यांच्या दोन भूमिकेत त्यांचा शब्द मान्य करू. चांगल्या भूमिकेत जर तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी यांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. मग तुम्हाला सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करण्याची गरज लागणार नाही. पण जर मराठा आणि कुणबी एकच आहे, असा कायदा तुम्ही काढला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. जसं तुम्ही म्हणतात तसं तुम्ही गोडी गुलाबीने मराठ्यांचं आरक्षण हाताळलं ते तुम्हाला बरं पडेल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारलाच आव्हान दिलंय. जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. जर मराठ्याचे आरक्षण तुम्ही व्यवस्थित नाही हाताळले नाही तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना बाजूला ठेवलं तर अमित शाह तुमची घोडचूक असणार आहे. कोणतीही यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू शकत नाही. असं मनोज जरांगे म्हणाले.

Published on: Sep 29, 2024 12:34 PM