राजीनामा दे किंवा डोक्यावर घेऊन हिंड, पण… भुजबळांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर जरांगे पाटलांचं टीकास्त्र
मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला, असल्याचा मोठा गौप्यस्फोट ओबीसी ऐल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : गेल्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. तर मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला, असल्याचा मोठा गौप्यस्फोट ओबीसी ऐल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा पण मराठ्यांवर बोलू नका, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तर पुढे असेही म्हणाले, छगन भुजबल विचित्र आहे. सगळे पक्ष त्यांनी मोडलेले आहेत. ज्या पक्षाने त्याला मोठं केलं तो पक्ष पण त्यांनी आता मोडला आणि हे सरकारही मोडून टाकणार आहे, असा निशाणाही जरांगे पाटलांनी भुजबळांवर साधला आहे.