‘एक खून करून पोट भरलं नाही? माझ्या नादी लागू नको…’, एकेरी उल्लेख करत जरांगेंचा थेट मुंडेंवर आरोप
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले हाते.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेला महिना उलटला तरी अद्याप काही आरोपी मोकाट आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन केले जात आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले हाते. तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चात सहभागी होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत थेट आरोप केल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, असं एकेरी वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे. इतकंच नाहीतर एक खून केला तरी पोट भरलं नाही का? असा सवाल करत धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.