महिन्याभरात सगेसोयऱ्यांचा कायदा होणार? तसं झालं नाहीतर… जरांगे पाटलांचं सरकारला अल्टिमेटम काय?
सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ, असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं. जर मागणी मान्य नाही झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून पाडण्याचाही इशारा त्यांनी दिला.
उपोषण स्थिगित करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. मात्र मराठ्यांसाठी सगेसोयऱ्यांचा कायदा झाला नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये २८८ ठिकाणी पाडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटी येथे दाखल होत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण महिन्याभरासाठी स्थगित करण्यात त्यांना यश आलं. मराठा आरक्षणासाठी सगेसोयऱ्यांची अधिसूचना कायद्यात बदला या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक होऊन सहा दिवस त्यांनी उपोषण केलं होतं. दरम्यान, शंभूराज देसाई यांनी दोन महिन्यांची मुदत मागितली पण जरांगेंनी ती नाकारत केवळ एक महिन्याचा वेळ दिला. इतकंच नाहीतर मागणी मान्य नाही झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून पाडण्याचाही इशारा त्यांनी दिला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 14, 2024 11:06 AM