Jarange Patil Threat : ’10 मिनिटांत कार्यक्रम…’; मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?

| Updated on: Oct 24, 2024 | 3:24 PM

मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समधून ही धमकी मिळाल्याचे समजतेय. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये एका अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या कॉमेंटचा स्क्रिन शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची ही धमकी असल्याचं कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्यात आलं आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक हँडलवरून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. १० मिनिटांत मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम करणार अशी धमकी यात देण्यात आली आहे. जरांगेंना मिळालेल्या धमकीनंतर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची आता तपासणी केली जाणार असल्याची माहितीही मिळतेय. मनोज जरांगे पाटील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Published on: Oct 24, 2024 03:03 PM
अर्ज किया है… यशोमती ठाकूर यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करताना बाईक रॅली
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, ‘आज माझी बहीण माझ्यासाठी….’