मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा केलं सरकारला लक्ष्य, विधानसभेच्या जागांवर दिला इशारा

| Updated on: Jun 02, 2024 | 11:45 AM

सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारलाच लक्ष्य केलं आहे.

Follow us on

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारलाच लक्ष्य केलं आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ४ जून रोजीच आमरण उपोषण करणार आहेत. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून आमरण उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत.