मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, सरकारला थेट 10 दिवसांचा अल्टिमेटम

| Updated on: Oct 15, 2023 | 9:00 AM

tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसांपैकी आता फक्त १० दिवस शिल्लक राहिले आहेत, असं म्हणत मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा थेट इशारा दिला आहे. काय म्हणाले बघा...स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय. सरकारला दिलेल्या ४० दिवसांपैकी आता फक्त १० दिवस शिल्लक आहेत. त्यावरून मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या अशी मागणी पुन्हा जरांगे पाटील यांनी केली. जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलं. उरलेल्या १० दिवसांत आरक्षण दिलं नाही तर टोकाचं आमरण उपोषण करणार आणि त्याची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला असून आता तुमच्याकडे फक्त 10 दिवस असल्याचे म्हटले आहे. तर आता एक तर विजय यात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्राच निघेल असे म्हणत जरांगे पाटलांना थेट इशाराच सरकारला दिला आहे.

Published on: Oct 15, 2023 09:00 AM
सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपच्या चित्रा वाघ अन् राष्ट्रवादीचे मेहबुब शेख आमने-सामने
छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ टीकेवर मनोज जरांगे बरसले; म्हणाले, ‘मराठ्यांचं रक्त प्यायले…’