‘२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता…’, मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

| Updated on: Sep 18, 2024 | 1:34 PM

आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे ठणकावत मराठे २०२४ ला वाट लावणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाली तर बोंबलत बसू नका, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो तुम्ही खड्ड्यात जा, तुमच्या राजकारणाशी मला काही देणं-घेणं नाही. मात्र मराठ्यांना सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी हवी, ही मराठा समाजाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.  ‘जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्ही फक्त आता पुढचं बघा’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले, मराठ्यांचे पोर आता गप्प नाही राहणार… २०२४ ला वाटच लावणार असा इशारा त्यांनी दिला तर आमरण उपोषण करून जीवाची बाजी लावली आहे. आमचा पुढचा खडतर प्रवास आहे. सरकारला शेवटची संधी दिली. आम्हाला राजकारणात नाही जायचं. फक्त मराठ्यांच्या मागण्यांची अमंलबजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांकडे करत इशाराही दिला आहे.

Published on: Sep 18, 2024 01:34 PM
‘राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके…’, शिंदेंच्या आमदारानंतर भाजप खासदाराची जीभ घसरली
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? महिला मुख्यमंत्रिपदावर काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?