जरांगे पाटलांचा अल्टिमेटम १३ तारखेचा, काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या १३ तारखेला संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढा नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यानंतर सरकारनं काय घेतला निर्णय बघा स्पेशल रिपोर्ट?
मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या १३ तारखेला संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढा नाहीतर एकाही आमदाराला निवडून येऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुबणी एकच असून सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी अध्यादेश काढणारच असल्याचे म्हटलं आहे. तर ज्या मराठ्यांची कुणबी नोंद आढळली आहे. त्यांना त्या नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र द्या, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. यानंतर सरकारनं काय घेतला निर्णय बघा स्पेशल रिपोर्ट?
Published on: Jul 07, 2024 10:59 AM