…तर तुमचा अन् आमचा विषय संपला, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला टोकाचा इशारा
मराठा आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं? याची माहिती 17 डिसेंबरपर्यंत द्या...नाहीतर आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर मराठा आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात नवा कायदा करू, असा दावा बच्चू कडू यांनी केला. १७ डिसेंबरपर्यंत आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं हे सांगा नाहीतर...
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : मराठा आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं? याची माहिती 17 डिसेंबरपर्यंत द्या…नाहीतर आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर मराठा आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात नवा कायदा करू, असा दावा बच्चू कडू यांनी केला. १७ डिसेंबरपर्यंत आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं हे सांगा नाहीतर एकदा रणनिती ठरवली आणि आंदोलनाला सुरूवात केली तर सरकारसोबत आपला संबंध नाही, अशी टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. उपोषण सोडवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे, बच्चू कडू यांच्यासोबत काय ठरलं होतं. याचा कागदही सार्वजिनक करण्याची तयारी जरांगे पाटील यांची आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या कुणबी सापडणार नाही त्यांच्यासाठी नवा कायदा करणार असल्याचे दावा बच्चू कडू यांनी केलाय. बघा नेमकं काय म्हटलं आमदार बच्चू कडू यांनी…
Published on: Dec 15, 2023 11:00 PM