मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, ‘बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे संपवणार’

| Updated on: Oct 20, 2024 | 2:35 PM

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक होतेय. विधानसभा निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे किंवा कुणाला पडायचे की, स्वतःचे उमेदवार उभे करायचे हा निर्णय बैठकीत घेणार आहेत.

आमचं लक्ष पक्क आहे आणि त्या लक्षाचा वेध आम्ही घेतला आहे. आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार आहे, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. मग प्रक्रिया कोणतीही असो. आमच्या समाजील गोरगरिब लेकरांची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. बदला घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हात तोंडाला आलेला घास सरकारने काढून घेतला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला, पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमच्या समाजातील बळी घेतले. शेवटी जातात जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये या भूमिकेतून सरकार विशेषतः देवेंद्र फडणवीस उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Published on: Oct 20, 2024 02:34 PM