Manoj Jarange Patil : आम्हीही वस्ताद, जिरवल्याशिवाय सोडणार नाही; उपोषणादरम्यान जरांगे पाटलांचा थेट इशारा

| Updated on: Jun 12, 2024 | 2:41 PM

'आम्ही उमेदवार दिला नाही तर एका एकाची जिरवल्याशिवाय सोडणार नाही. समाजाचा छळ केला तर आम्हीही वस्ताद आहोत. माझ्याशिवाय समाजाचं पानही हलत नाही. आम्ही खंबीर आहोत. आम्हाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या. पण तुम्ही मजा बघणार असाल तर...', मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. एवढा वेळ थोडाच लागतो. आम्ही सलाईन कुणाच्या शब्दाला मान ठेवून लावली ते जाहीरपणे सांगू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर राज्य सरकारने मागेही 17 दिवस आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं. आताही दुर्लक्ष करतील. लोकसभेला फटका बसला म्हणून दुर्लक्ष केलं तर यापेक्षा दहापट फटका विधानसभेला बसेल, असा मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना इशारा दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आम्ही उमेदवार दिला नाही तर एका एकाची जिरवल्याशिवाय सोडणार नाही. समाजाचा छळ केला तर आम्हीही वस्ताद आहोत. माझ्याशिवाय समाजाचं पानही हलत नाही. आम्ही खंबीर आहोत. आम्हाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आरक्षण द्या. पण तुम्ही मजा बघणार असाल तर तुम्हाला विधानसभेतून आऊट करू. आम्ही फक्त सावध करतोय, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर जोपर्यंत काम होत नाही, विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास नाही. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू तर करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू. आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकू, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 12, 2024 02:41 PM
Manoj Jarange Patil : मध्यरात्री कोणत्या मंत्र्याचा फोन?; मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट काय?
Kokan Rain Forecast : कोकणवासियांसाठी मोठी बातमी; कोकणात ऑरेंज अलर्टसह पुढील पाच दिवस…