‘नुसती नाटकं सुरू, यापुढे महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही’, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
आज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत
जालना, १३ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचं आजही सलग चौथ्या दिवशी उपोषण सुरु आहे. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. पण ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. तर “महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “नुसतं नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. तर काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.