Manoj Jarange Patil : …तर त्यापुढचं आंदोलन झेपणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा काय?

| Updated on: Oct 17, 2023 | 11:50 AM

tv9 Marathi Special Report | अंतरवाली सराटीत झालेल्या मराठ्यांच्या सभेत हिंसाचार घडवण्याचा डाव होता का? असा आरोप जरांगेंनी सरकारवर केला आहे. तर आरक्षणासाठी दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपतणार त्यानंतर 5 मिनिटांचाही वेळ देणार नाही, जरांगेंचा इशारा

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या सभेत, हिंसाचार घडवण्याचा डाव होता का ? असा आरोप जरांगेंनी सरकारवर केला आहे. गावांमधली लाईट आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, असं जरांगे म्हणालेत. तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपतेय. आता 24 ऑक्टोबरनंतर 5 मिनिटांचाही वेळ देणार नाही आणि मराठा समाजाला कुणबीचं जातप्रमाणपत्र न मिळाल्यास सरकारला त्यापुढचं आंदोलन झेपणार नाही, असं इशारा जरांगेंनी दिला आहे. शनिवारी अंतरवाली सराटी गावात मोठी सभा घेऊन, जरांगे पाटलांनी सरकारला चुणूक दाखवली. 100 एकर जागेवर मराठा बांधवांची मोठी जनसंख्या उसळली होती. मात्र आता जरांगेंच्या सभेला, सभेनं उत्तर देण्याची तयारी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. 10 नोव्हेंबरला हिंगोलीत शेंडगेंनी ओबीसी मेळावा आयोजित केला. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा शेंडगे यांचाही आहे. बघा काय म्हणाले ओबीसी नेते…

Published on: Oct 17, 2023 11:50 AM
Chandrakant Patil : तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवं UNO संयुक्त राष्ट्र उभारतील, चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
पुण्यात दादांविरूद्ध ताईंमध्ये सामना? पुण्याचे कारभारी बदललेत त्यामुळं… सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना आव्हान?