आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम, धनगर…; जरांगेंचा सरकारला खोचकपणे इशारा
विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे केले तर सर्व जातींचे उमेदवार उभे करणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला दिला. 'समाजातील सर्व जाती धर्माचे लोक समान्य प्रवाहात एकत्र आलेत तर आपापल्या जातीला न्याय देता येईल', असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे केले तर सर्व जातींचे उमेदवार उभे करणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला दिला. ‘मला राजकारणात जायचं नाही, माझा जन चळवळीवर विश्वास आहे’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ५४ लाख नोंदींचा दाखला दिला तर ५७ लाख नोंदी निघाल्या असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. ‘समाजातील सर्व जाती धर्माचे लोक समान्य प्रवाहात एकत्र आलेत तर आपापल्या जातीला न्याय देता येईल’, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे ते असेही म्हणाले, मला राजकारणात जायचं नाही. माझा तो मार्ग नाही तर माझा जनचळवळीवर विश्वास आहे. या जनचळवळीमुळेंच माझ्या समाजाला न्याय मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटले.