याच मराठ्यानं गादीवर बसवलं, पण आता तुम्हाला जड जाईल… जरांगे पाटील यांचा इशारा काय?

| Updated on: Dec 23, 2023 | 4:48 PM

'आमच्यावर गुन्हे दाखल केले. दाखल केलेले गुन्हे मागे घेऊ म्हणाले तेही नाही घेतले. आम्ही वेळोवेळी मागेल तेवढा वेळ सरकारला दिला. काय चुकलं आमचं. ज्यांनी काही केलं नाही त्यांना नोटीस मिळाल्या. तुम्ही मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढा. निर्णयाच्या भूमिकेकडे यावं.'

बीड, २३ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होतेय. त्यापूर्वी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय. मराठा समाज कुणबी समाजात आहे. तशा नोंदीपण मिळाल्यात. कुणबी आणि मराठा एक असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले. दाखल केलेले गुन्हे मागे घेऊ म्हणाले तेही नाही घेतले. आम्ही वेळोवेळी मागेल तेवढा वेळ सरकारला दिला. काय चुकलं आमचं. ज्यांनी काही केलं नाही त्यांना नोटीस मिळाल्या. तुम्ही मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढा. निर्णयाच्या भूमिकेकडे यावं. अंतरवालीमध्ये घडवून आणलं सरकारने ते पुन्हा घडवू नये, त्या वाटेकडे जाऊ नये, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली. तर ही गर्दी म्हणजे ही गोरगरिबांची वेदना आहे. त्यामुळे विनंतीपूर्वक सांगतो मराठ्यांना आरक्षण द्या. नाहीतर आता तुम्हाला जड जाईल. ज्या मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलं. तुम्ही त्याचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करणार, गुन्हे दाखल करणार, ही कोणती भूमिका आहे? हे नाही चालणार असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय.

Published on: Dec 23, 2023 04:48 PM
Local Mega Block : मुंबईकरांनो… उद्या लोकलने प्रवास करताय? रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार जम्बो ब्लॉक
मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन कोर्टानं स्वीकरलं, आता पुढे काय?