Maratha Reservation : … तर मी स्वत: इथून उठेन आणि बीडच्या एसपी, कलेक्टरच्या समोर जावून बसेल, जरांगे यांचा इशारा काय?
Manoj jarange patil on curfew in Beed district ... पण मी तिथे समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले तर तुमची संचारबंदी राबवायची ती राबवा. पण महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवाला त्रास झाला तर...जरांगे पाटील यांचा इशारा काय
जालना, ३१ ऑक्टोबर २०२३ | बीड जिल्ह्यात संचारबंदी लावली त्यावर आमचं काही म्हणणं नाही. पण गोरगरिबांच्या लेकरांना तुमचा एसपी आणि कलेक्टर हटवत असतील तर हे प्रकार बंद करा, असे म्हणत सरकारला जरांगे पाटील यांनी थेट तंबी दिली आहे. जरांगे म्हणाले, आंदोलन अगोदर आहे, नंतर तुमची संचारबंदी. अगोदर आम्ही आहोत. त्यामुळे तुमची संचारबंदी बाजूला ठेवला. जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला, त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वत: जालन्यातून उठेन आणि बीडच्या एसपी आणि कलेक्टरच्या समोर जावून बसेल. मग तिथे 10 लाख मराठे येतील का ते मला माहिती नाही. पण मी तिथे समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होईल, असे जरांगे पाटील म्हणाले. तर तुमची संचारबंदी राबवायची ती राबवा. पण महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवाला त्रास झाला तर सरकारसह संबंधित प्रशासनाला आम्ही गप्प बसू देणार नाही. याला धमकी समजू नका. आम्हाला त्रास देता. मग तुम्हालाही सुट्टी नाही. एकदा तुमच्याकडून झालं. ते आम्ही सहन केलं. पण यापुढे आम्ही सहन करणार नाहीत, असे म्हणत जरांगेंनी पुन्हा धमकी दिली.