मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार? SIT चौकशीच्या फेऱ्यात मराठ्यांचं आंदोलन

| Updated on: Feb 28, 2024 | 12:22 PM

मनोज जरांगे पाटील यांची भाषा आणि त्यांचा बोलवता धनी कोण? तर दगडफेकीमागचा मास्टरमाईंड कोण? हे शोधण्याचं काम आता एसआयटी करणार आहे. विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार हे आक्रमक झाले आणि त्यांची जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयची चौकशी करण्याची मागणी

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांना जबर धक्का बसलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आता एसआयटी होणार आहे. जरांगेंच्या मागे नेमकं कोण? याचा तपासही एसआयटी चौकशीमार्फत केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत भाजपचे आमदार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीस जरांगेंवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांची भाषा आणि त्यांचा बोलवता धनी कोण? तर दगडफेकीमागचा मास्टरमाईंड कोण? हे शोधण्याचं काम आता एसआयटी करणार आहे. विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार हे आक्रमक झाले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयची चौकशी करण्याची मागणी केली. तर प्रविण दरेकर यांना मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, अशीच थेट मागणी केली. दरम्यान, आशिष शेलार यांनी एसआटची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 28, 2024 12:22 PM