मुंबईत गुलाल किंवा उपोषण… आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा, आरक्षण मिळालं किंवा नाही…
२० जानेवारीच्या आत आरक्षण मिळाल्यास गुलाल घेऊन किंवा उपोषणासाठी मुंबईला जाणार असल्याचा चंग मनोज जरांगे पाटील यांनी बांधलाय. मंगळवारी बच्चू कडू यांनी सगसोयरे या शब्दाचा मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ज्यात काही बदल जरांगेंनी सुचवले त्यामुळे सुधारित मसुदा घेऊन बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना भेटणार
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यापूर्वी जरांगे पाटील पून्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कारण शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर लिखीत आश्वासन सरकार जरांगेना देऊ शकतं. २० जानेवारीच्या आत आरक्षण मिळाल्यास गुलाल घेऊन किंवा उपोषणासाठी मुंबईला जाणार असल्याचा चंग मनोज जरांगे पाटील यांनी बांधलाय. मंगळवारी बच्चू कडू यांनी सगसोयरे या शब्दाचा मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ज्यात काही बदल जरांगेंनी सुचवले त्यामुळे सुधारित मसुदा घेऊन बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना भेटणार आहे. जातीय विवाहातील मुला मुलींच्या नोंदींवरून कुणबी दाखले मिळणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्या नोदींच्या आधारे जातप्रमाणपत्र मिळणार आहे. तर कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना २० जानेवारीच्या आत जातप्रमाणपत्र द्या, असं जरांगेंचं म्हणणंय. काय आहे सरकारच्या मसुद्यात? मनोज जरांगे यांचं म्हणणं सरकारच्या मसुद्यात येणार? बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट