मनोज जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा

| Updated on: Oct 18, 2024 | 11:27 AM

सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र एका घरात एकच तिकीट या धोरणामुळे भाजपने तिकीट नाकारल्याची माहिती आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील हे अपक्ष लढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय एन्काऊंटर करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा फटका महायुतीला चांगलाच बसला तर आता विधासभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ जागा असून मनोज जरांगे पाटील हे खेळ बिघडवू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणूक लढायची का? याचा निर्णय २० तारखेला मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. त्याआधीच जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी मुलाखती घेतल्या असून संभाव्य यादी देखील त्यांनी तयार केली आहे. मात्र इच्छुकांच्या भेटीगाठीसह रात्री झालेल्या दोन भेटी खास महत्त्वाच्या आहेत. भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री पावणे दोन वाजता भेट घेतली. गेल्या आठ दिवसांत विखे पाटील जरांगेंच्या दोन वेळा भेटीला आलेत. तर विखे गेल्यानंतर रात्री पावणे तीन वाजता शरद पवार गटाचे राजेश टोपे यांनी भेट घेतली आहे.

Published on: Oct 18, 2024 11:27 AM
Ladki Bahin Yojana : महिलांनो… लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून पैस घेतले? डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी अन् होणार वसुली?
भाजपचं ठरलं? 110 जणांची नावं निश्चित, विधासभेसाठी ‘या’ आमदारांचा पत्ता कट, तर कोणाला मिळणार संधी?