मनोज जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? ‘या’ आमदारानं काय दिला संकेत?
वाशिम जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवले तर लातूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांना जरांगे पाटील यांची समर्थकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. वाशिममधील एका गावात काल जरांगे यांची सभा होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : वाशिम जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवले तर लातूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांना जरांगे पाटील यांची समर्थकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. वाशिममधील एका गावात काल जरांगे यांची सभा होती. त्यावेळी हा प्रकार घडला. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत. तर काहींनी राजीनामेसुद्धा दिले आहेत. त्यात आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होतेय. या राजकीय राजीनाम्यांच्या सत्रानंतर, शरद पवार गटातील आमदार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जे सध्या सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी लढताय ते कदाचित जानेवारी महिन्यात राजकारणात येतील, असं विधान रोहित पवार यांनी केलंय. त्यामुळे त्यांचा रोख जरांगे पाटील यांच्याकडे होता का? अशी चर्चा या विधानाने सुरू झाली आहे.