नारळ फोडला… चला मुंबईला; अंतरवलीत पहिला ट्रक दाखल; मनोज जरांगे बनले ड्रायव्हर

| Updated on: Jan 02, 2024 | 1:32 PM

20 जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक गावांमधून मराठा समाज मुंबईला धडकणार आहेत आणि त्यासाठी कोणी ट्रक, ट्रॅक्टरचा तर कोणी बैलगाडीचा वापर करणार आहे. आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेवराईहून सजवलेला ट्रक मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यासाठी आणण्यात आला

जालना, अंतरवाली सराटी, २ जानेवारी २०२४ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरंगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत. 20 जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक गावांमधून मराठा समाज मुंबईला धडकणार आहेत आणि त्यासाठी कोणी ट्रक, ट्रॅक्टरचा तर कोणी बैलगाडीचा वापर करणार आहे. दरम्यान, आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेवराईहून सजवलेला ट्रक मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यासाठी आणण्यात आला आणि त्याची पाहणी जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत ट्रकपुढे नारळ फोडलं आणि ट्रकची पूजा केली इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील हे ट्रक ड्रायव्हरच्या सीटवर बसले.

Published on: Jan 02, 2024 01:32 PM
Truck Driver Strike | … दक्षता घ्या, ट्रक चालकांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना?
नादखुळा! मनोज जरांगे पाटील यांचा जबरा फॅन, थेट छातीवर गोंदून घेतला टॅटू