माझा जीव धरणीला टेकला तरी…, प्रकृती अत्यंत खालावली असताना जरांगे पाटलांचा निर्धार कायम

| Updated on: Dec 11, 2023 | 11:10 PM

डॉक्टरांनी तीन महिने आराम करा असं सांगितलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आनंदाचा विजयाचा क्षण जवळ आलेला असताना मी थकता पळतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बीड, ११ डिसेंबर २०२३ : डॉक्टरांनी तीन महिने आराम करा असं सांगितलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आनंदाचा विजयाचा क्षण जवळ आलेला असताना मी थकता पळतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझा जीव धरणीला टेकला तरी आरक्षण देणारच असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. दरम्यान, आज धाराशिव येथे सभा सुरू असताना अचानक त्यांची तब्येत खालावल्याचे समोर आले. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे आज जाहीर सभा होती. मात्र ही जाहीर सभा सुरू असताना जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांनी बसून भाषण केल्याचे पाहायला मिळाले. भाषण करत असताना मनोज जरांगे आज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 11, 2023 11:10 PM
आमची औकात नाही, आम्ही शेपूट घालून आहोत; सभागृहात बच्चू कडू भडकले
गुणरत्न सदावर्ते अडचणीत? एसटी बँकेतील कारभाराचा मुद्दा सभागृहात, आरोपांना उत्तर देताना सदावर्ते थेट हिंदुत्वावर