ईशान्य मुंबईतून राऊत विरूद्ध मनोज कोटक? उद्धव ठाकरे संजय राऊत यांना लोकसभेत उतरवणार?

| Updated on: Aug 21, 2023 | 9:47 PM

VIDEO | संजय राऊतांनी आता आपणही येत्या लोकसभेच्या निवडणुकीत लढणार, याचे संकेत दिलेत. पक्षानं आदेश दिल्यास ईशान्य मुंबईतून लोकसभा लढवणार असं संजय राऊत म्हणालेत आणि तसं झालं तर मग, ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईतून संजय राऊत उमेदवार असू शकतात.

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | विरोधक कायमच त्यांना जनतेतून निवडणूक लढण्याचं आव्हान देतात. मात्र खरंच, 8 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राऊत ईशान्य मुंबईतून लढू शकतात. संजय राऊतांनी आता आपणही येत्या लोकसभेच्या निवडणुकीत लढणार, याचे संकेत दिलेत. पक्षानं आदेश दिल्यास ईशान्य मुंबईतून लोकसभा लढवणार असं संजय राऊत म्हणालेत आणि तसं झालं तर मग, ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईतून संजय राऊत उमेदवार असू शकतात. ईशान्य मुंबईतून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती..आणि युतीत ही जागा भाजपचं लढवायची. 2019 मध्ये भाजपचे मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटलांमध्ये थेट लढत झाली. भाजपच्या मनोज कोटकांना 5 लाख 14 हजार 599 मतं मिळाली तर संजय दिना पाटलांना 2 लाख 88 हजार 113 मतं मिळाली, 2 लाख 26 हजार 486 मतांनी कोटक विजयी झाले. मात्र आता संजय दिना पाटीलही राष्ट्रवादी सोडत, उद्धव ठाकरे गटात आलेत. त्यामुळं त्यांचं ठाकरे गट काय करणार हाही प्रश्न आहेच. राऊतांनी आपण लोकसभा लढू शकतो असं म्हटलं, आणि इकडे भाजपच्या नितेश राणेंसह शिंदे गटाच्या शिरसाटांनी पुन्हा राऊतांना डिवचलं. नितेश राणेंनी तर रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लढण्याचं आव्हान दिलंय. बघा काय म्हणाले नितेश राणे…

Published on: Aug 21, 2023 09:46 PM
विजयकुमार गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘गावित यांचं वक्तव्य म्हणजे…’
कांद सोडा अन् मासे चालू करा! काय ते मंत्री, काय ते सल्ले? कोणत्या राजकीय नेत्यानं काय म्हटलं?