WITT Global Summit : काश्मीरमध्ये पूर्वी शांतता विकत घेतली होती, मात्र आता तिथे… मनोज सिन्हा

| Updated on: Feb 27, 2024 | 4:22 PM

केंद्रशासित प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याबाबत मनोज सिन्हा म्हणाले की, पूर्वी तेथे शांतता विकत घेतली जायची, आता तेथे सुशासन म्हणजेच चांगले प्रशासन आहे. तर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत ते म्हणाले...

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी, २०२४ : मंगळवारी टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या ‘सत्ता संमेलन’मध्ये बदलत्या जम्मू-काश्मीरबद्दल काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोकळेपणाने आपली मतं मांडली. केंद्रशासित प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याबाबत मनोज सिन्हा म्हणाले की, पूर्वी तेथे शांतता विकत घेतली जायची, आता तेथे सुशासन म्हणजेच चांगले प्रशासन आहे. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत ते म्हणाले की, वेळ आल्यावर त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. ‘सत्ता संमेलना’मध्ये बदलत्या काश्मीरबद्दल बोलताना उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, “आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्व धर्माच्या लोकांना त्यांचे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. कोणीही येथे जमीन खरेदी करू शकतो.”काश्मीरच्या बदलत्या वातावरणाचा संदर्भ देताना ते म्हणाले, पूर्वीच्या तुलनेत तेथील परिस्थिती खूप बदलली आहे. काश्मीरमध्ये रात्री ११ वाजता झेलम नदीच्या काठावर तरुणाई गिटार वाजवताना दिसतील. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या धोरणांमुळे हे शक्य झाले, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 27, 2024 04:22 PM
WITT Global Summit : ‘मोदी गॅरंटी’ आणि ‘अच्छे दिन’वरून काँग्रेसचा हल्लाबोल
Video | ‘नारायण राणेंना अटक केली, तर जरांगेंना…,’ काय म्हणाले प्रवीण दरेकर