Mantralaya Bomb Threat गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकी, निनावी फोन आला अन्…
VIDEO | मुंबई मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची निनावी फोनवरुन धमकी, थेट मंत्रालय उडवून देण्याची धमकी, कुणी केला निनावी धमकीचा फोन अन् काय होतं कारण?
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | गेल्या सहा दिवसांपूर्वी 25 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कोणीतरी फोन करून विमानतळावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज मुंबईतील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही धमकी एका निनावी फोन कॉलवरून आल्याचे सांगितले जात असून गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा अशी धमकी देण्यात आली आहे. मंत्रालयासंदर्भात येणाऱ्या वारंवार धमक्यांमुळे आता मंत्राल्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित केले जात आहे. गुरुवारी मंत्रालयात फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण्याची मागणी निनावी फोन करणाऱ्याने केली, मात्र मुख्यमंत्र्यांशी संभाषण झाले नाही, तेव्हा त्याने मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. धमकीच्या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली आहे. फोन करणाऱ्याने अहमदनगर येथून फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर तपासानंतर कुठेही बॉम्ब नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.