उमेदवारी मिळाली तर… कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपतींचं सूचक वक्तव्य

| Updated on: Feb 23, 2024 | 5:00 PM

कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार आहे, असे वक्तव्य शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे. तर महाविकास आघाडीकडून अजून ऑफर नाही मात्र ऑफर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Follow us on

कोल्हापूर, २३ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. तर कुणाचे कोणते उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार आहे, असे वक्तव्य शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे. तर हे सांगत असताना त्यांनी असेही म्हटले की, महाविकास आघाडीकडून अजून ऑफर नाही मात्र ऑफर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली होती. तर महाविकास आघाडीची ऑफर येण्याची शक्यता आहे, असे म्हणत शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण सगळे मिळून वाटचाल करुया असे म्हटले.